आदिवासी नग्न नृत्य, १५ जणांना भोवले कृष्णकृत्य - Marathi News 24taas.com

आदिवासी नग्न नृत्य, १५ जणांना भोवले कृष्णकृत्य

www.24taas.com, अंदमान
 
अंदमानमध्ये जरावा जातीच्या आदिवासी महिलांना अर्धनग्न अवस्थेत नाचण्यास भाग पाडून त्यांचे शोषण करणाऱ्या १५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जरावा जातीच्या या महिलांना नग्न अवस्थेत नृत्य केल्यानंतर त्यांच्यावर अन्न फेकले जाते.
 
अंदमान येथील जरावा जातीच्या महिलांच्या व्हिडिओ बनवणं आणि त्या बाजारात आणणं याविरोधात अंदमान पोलिसांनी गुरवारी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दरम्यान यांना जरावा जातीच्या लोकांचे अन्नासाठी त्यांचे शोषण केलं जातं, या लोकांना अन्नाची भ्रांत असल्याने त्यांना तेथे येणारे पर्यटक अर्धनग्न अवस्थेत नाचण्यास लावतात, त्यांचे एकप्रकारे शोषण केले जाते. त्यामुळे आता तेथील गृहमंत्रालयाने बुधवारी अंदमान निकोबार प्रशासनाकडे याचा रिपोर्ट मागवला आहे.
 
जरावा आदिवसीयांच्या नृत्याच्या मुद्द्यावरील प्राथमिक रिपोर्ट प्रशासनाने अंदमान निकोबार प्रशासनाने गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे.  केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव शक्ति सिन्हा यांना जरावा आदिवासीच्या या केल्या जाणाऱ्या अत्याचाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाचा एका अधिकाऱ्याने सांगितले की मीडियाने दिलेल्या बातमीनंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. मागवलेल्या रिपोर्टमध्ये या जातीच्या आदिवसी महिलांना पर्यटक अर्धनग्न अवस्थेत नृत्य करण्यास भाग पाडतात.
 
स्थानिक प्रशासनाला या लोकांवर चित्रित केलेले व्हिडिओ कोणी केले याचा शोध घेण्यास सांगितले आहे. जेव्हा हे व्हिडिओ तयार होत होते तेव्हा या आदिवासी जातीतील लोक बाहेरच्या लोकांच्या संपर्कात कसे आले? जेव्हा की हे लोक आपलं जीवन अगदी एकांतात जगत असतात. या महिलांचे शोषण करणाऱ्या लोकांचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसचं जबाबदार लोकांविरोधात दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. तेथील अधिकाऱ्याने सांगितले की, तिथे जाण्याचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यास  वेळ लागू शकतो कारण त्यात तांत्रिक अडचणी आहे. असे म्हंटले आहे
 

First Published: Thursday, January 12, 2012, 14:39


comments powered by Disqus