Last Updated: Thursday, January 12, 2012, 18:21
www.24taas.com, उज्जैन
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
काही हजारांत कमाई असलेल्या पालिकेतल्या कारकुनाकडे एवढी काळी कमाई सापडली की ती पाहून कुणाचेही डोळे फिरतील. २० वर्षांच्या नोकरीत त्यानं ही संपत्ती कमावली आहे. छाप्यामध्ये या कारकुनाकडे सोनं-चांदी, दोन घरं, एक दुकान, इंदुरमध्ये एक फ्लॅट, दोन जेसीबी, दोन डंपर, एक टाटा सफारी अशी मोठी कमाई सापडली आहे.
नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कारकून असलेल्या या कारकुनाची कमाई हजारोंत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले कुठून असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मात्र, आपल्या मुलाच्या धंद्यातून आपण हे पैसे जमवल्याचं त्याचं म्हणणं आहे.
First Published: Thursday, January 12, 2012, 18:21