मारूती ८००, अल्टो युगाचा अस्त ? - Marathi News 24taas.com

मारूती ८००, अल्टो युगाचा अस्त ?

www.24taas.com, नवी दिल्ली
 मारुती सुझूकी इंडिया लिमिटेड लवकरच सर्वाधिक खपाच्या मारुती ८०० आणि अल्टोचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
 
मारुती ८०० आणि अल्टोची जागा आता नवी मॉडेल्स घेतील. मारूतीची नवी मॉडेल्स अधिक ट्रेंडी, अत्याधूनिक आणि अधिक मायलेज देतील. ही नवी मॉडेल्स येत्या दोन वर्षात लँच करण्यात येतील.
 
मारूती सुझूकीचे व्यवस्थापकीय संचालक शिंझो नाकानिशी यांनी सांगितलं की ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन अल्टो आणि मॉडेल्स या आजवर सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या मॉडेल्स ऐवजी नवी मॉडेल बाजारात आणण्याचा विचार गांभीर्याने करण्यात येत आहे.
 
कंपनी आशिया, उत्तर आफ्रिका आणि लॅटिन आफ्रिकेच्या बाजारपेठेत या मॉडेल्स ऐवजी नवी मॉडेल लँच करण्याची योजना आखत असल्याचंही नाकानिशी यांनी सांगितलं.

नवी मॉडेल्समुळे कंपनीला ५५० कोटी रुपयांचा अधिक खर्च सोसावा लागेल. 

 
 

First Published: Thursday, January 12, 2012, 17:21


comments powered by Disqus