प्रियंका गांधी आमेठीच्या दौऱ्यावर - Marathi News 24taas.com

प्रियंका गांधी आमेठीच्या दौऱ्यावर

www.24taas.com, नवी दिल्ली
 
उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी- वढेरा १६ जानेवारीपासून तीन दिवस आमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
 
काँग्रेसच्या सत्रांनी सांगितलं की प्रियंका येत्या १६ जानेवारीला आमेठीला पोहोचतील आणि पुढील तीन दिवस आमेठी आणि रायबरेली येथे राहातील. यादरम्यान त्या कुठलीही सभा संबोधित करणार नाहीत. पण तेथील काँग्रेसी कार्यकर्त्यांबरोबर त्यांची बैठक होईल.
 
१८ जानेवरीला प्रियंका गांधी पुन्हा दिल्लीस परततील.

First Published: Saturday, January 14, 2012, 23:08


comments powered by Disqus