बारगर्ल्सचा कानपूरमध्ये 'समाजवाद' ! - Marathi News 24taas.com

बारगर्ल्सचा कानपूरमध्ये 'समाजवाद' !

www.24taas.com, कानपूर
 
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसं मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सगळ्या पक्षांची त्रेधा तिरपिट उडाली आहे. मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी आकर्षित केलं जात आहे. मात्र, मतदारांना आकर्षित करण्यासाठी मसाजवादी पार्टीच्या एका उमेदवाराने तर कहरच केला.
 
शनिवारी मकरसंक्रांतीला कानपूरमध्ये नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला. आणि या नाच गाण्याच्या कार्यक्रमात मतदाराना माय बापांना खुश करण्यासाठी चक्क बार गर्ल्सला बोलवण्यात आलं. नृत्याच्या या कार्यक्रमात बारगर्ल्सनी अंगावर माफक कपडे घालून अश्लील हावभाव करत अत्यंत हिडीस नृत्य सादर केलं.
 
या प्रकाराची माहिती मिळताच भाजपने समाजवादी पार्टीला चांगलंच धारेवर धरलं. कानपूरचे भाजप उपाध्यक्ष सुरेंद्र मैथानी यांनी या प्रकारावरुन समाजवादी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. तसंच मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा अत्यंत सवंग प्रकार आहे, असंही ते म्हणाले. भाजप या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
 
 

First Published: Monday, January 16, 2012, 14:27


comments powered by Disqus