सोनियांच्या पोस्टर काळे, कार्यकर्ते भिडले - Marathi News 24taas.com

सोनियांच्या पोस्टर काळे, कार्यकर्ते भिडले

www.24taas.com, नवी दिल्लीत
 
दिल्लीत बाबा रामदेव आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरच हा गोंधळ झाला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पोस्टरला काळं फासल्यानंतर हा गोंधळ झाला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि बाबा रामदेव समर्थक आपसांत भिडले. भगतसिंग क्रांतीवीर सेनेनं सोनिया गांधींच्या पोस्टरला काळं फासल्याची माहिती आहे. पण हा गोंधळ बाबा रामदेव समर्थकांनीच घडवून आणल्याचा आरोप करण्यात येतोय.
 
दरम्यान योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप द्ग्विजय सिंग यांनी केला आहे. आणि शाई फेकण्याचं काम करणारा मनुष्य हा काँग्रेस विरोधक म्हणजेच भाजपशी संबंधित आहे.
 
दिग्विजय सिंग म्हणाले, “रामदेवांवर काळी शाई फेकला गेल्याचा व्हिडिओ पाहिल्यावर या घटनेमागे राजकारण आहे असं मला वाटतं. हे एक मोठं षड्यंत्र आहे. रियल कॉज ही एनजीओ चालवणाऱ्या कामरान सिद्दकीने ही शाई उडवली होती. कामरान पहिल्यापासून काँग्रेस विरोधक आहे. निवडणुकीत आमचे उमेदवार परवेझ हाश्मीलाही कामरानने विरोध केला होता. त्यांच्या एनजीओला राजगचं सरकार असताना सरकारी खजिन्यातून किती पैसा मिळाला याची चौकशी केली जावी.”
 
चेन्नईमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांनी बाबा रामदेव यांच्या हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला. घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
 

First Published: Monday, January 16, 2012, 18:01


comments powered by Disqus