Last Updated: Tuesday, January 17, 2012, 13:48
www.24taas.com,फतेहपूर अपहरण करून सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेशात एका २० वर्षीय महिलेला पेटवून देण्याचा संतापजनक प्रकार घडला. यातील माजीद या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, तिघे जण पळून गेले. फतेहपूर जिल्ह्यातील शिवपुरी गावात ही घटना घडली.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात २० वर्षीय महिलेचे अपहरण कऱण्यात आले. बलात्कारानंतर तिला पेटवून देण्यात आले. या महिलेला पेटल्यानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. .यावेळी तिने चौघांविषयी पोलिसांना माहिती दिली. यातील माजीद या संशयीत आरोपीला अटक करण्यात आली.
स्थानिक मार्केटमधून या चौघांनी या महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या महिलेने पोलिसांकडे जाऊ नये, यासाठी तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविण्यात आले. या आगीत ही महिला ७५ टक्के भाजली. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर भाजलेली महिला मृत्यूशी झुंज देत आहे.
First Published: Tuesday, January 17, 2012, 13:48