Last Updated: Wednesday, January 18, 2012, 15:34
www.24taas.com, नॉएडा देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीला लागूनच असणाऱ्या नॉएडामध्ये पुन्हा एकदा ऑनर किलींगची घटना घडली आहे. या घटनेत तीन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची हत्या केली.
नॉएडामधील नगला नगली गावात राहाणाऱ्या सीमाचं गावातल्याच एका मुलावर प्रेम होतं. मुलगाही त्याच गावातील होता. एकाच गावातले दोघे जण असल्यामुळे त्यांच्या प्रेमाचा गावभर बभ्रा झाला. आपल्या बहिणीच्या प्रेमाची बातमी तिचे भाऊ विशाल, सुभाष आणि ललित यांच्यापर्यंत पोहोचली. अशावेळी गावात, समाजात आणि जातीत आपली इज्जत कमी होऊ नये, यासाठी त्यांनी १ जानेवारीला आपल्याच अल्पवयीन बहिणीची हत्या केली.
बहिणीची हत्या केल्यावर त्यांनी बहिणीचं प्रेत हिंडन नदीमध्ये फेकून दिलं. पोलिसांनी आता तिन्ही भावांना अटक केली आहे. या हत्येमध्ये वापरलं गेलेलं फावडं आणि मुलीचंप्रेत यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
First Published: Wednesday, January 18, 2012, 15:34