निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींना जामीन - Marathi News 24taas.com

निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींना जामीन

www.24taas.comनवी दिल्ली 
 
पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना जामीन मिळाल्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांनी ही कॉंग्रेसची चाल असल्याचे म्हटले आहे.  सुरेश कलमाडी यांना  दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मिळाला आहे.
 
कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकऱणी ते नऊ महिने तिहार जेलमध्ये होते. सुरेश कलमाडी यांच्याबरोबरच व्ही.के. वर्मा यांनाही जामीन मिळाला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे सरकारला ९० कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागले होते. जामीन मंजूर झाल्याने ते आज तिहार कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, पुण्याचे खासदार असलेले कलमाडी येथील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामिनावर मुक्त झाल्याने काँग्रेसला आगामी निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, कॉंग्रेसच्या नेत्यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळले आहे. सुरेश कलमाडी यांना निलंबित करण्यात आल्याने यावर भाष्य नको, अशी प्रतिक्रिया नेते अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केली. पुण्यात त्यांचा तसा काही प्रभावनसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर काही नेत्यांनी कलमाडी यांना निवडणुकीपासून दूर ठेवले जाईल, असे म्हटले आहे.
 
कलमाडी यांच्याबरोबर या प्रकरणातील आणखी एक आरोपी मुख्य संचालक व्ही. के. वर्मा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. कलमाडी यांनी टाईमस स्कोअर आणि निकाल दाखविणाऱ्या मशीनचे कंत्राट ओमेगा या स्वीस कंपनीला जास्त दरात दिल्याने देशाला ९० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमुळे कलमाडी यांनी संयोजन सिमितीच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. २५ एप्रिलला त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तिहार कारागृहात होते.
 

 

First Published: Thursday, January 19, 2012, 12:50


comments powered by Disqus