नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली - Marathi News 24taas.com

नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामागून गुजरात दंगलीतील समावेशाबाबत प्रश्न काही कमी होताना दिसत नाहीत. दंगलीदरम्यान ठार झालेले झाकिया जाफरी यांच्या हत्येची चौकशी करीत असलेले एमिकस क्यूरी राजू रामचंद्रन यांच्या अहवालानुसार मोदींच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
 
मोदींविरोधात आरोपपत्र तयार करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्रन यांच्या अहवालानुसार  दंगलीशी संबंधित माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच मोदींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
 
सध्या हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी बनविलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआय़टी) पाठविण्यात आला आहे. एसआटीने यापूर्वी नरेंद्र मोदींविरोधात दंगली प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता या अहवालामुळे मोदींवर कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.
 

First Published: Saturday, November 5, 2011, 13:24


comments powered by Disqus