गोध्रा येथे मोदींचा सद्भावना उपवास - Marathi News 24taas.com

गोध्रा येथे मोदींचा सद्भावना उपवास

www.24taas.com , अहमदाबाद
 
 गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज शुक्रवारी  गोध्रा येथे एक दिवसाचे सद्भावना उपवास आंदोलनाला बसले आहेत. या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
 
 
मोदींबरोबर ८००० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नरेंद्र मोदींना जशास तसे उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसने सत्कर्म उपवास सुरू केला आहे. नरेंद्र मोदींचे आंदोलन गोध्रा येथील एसआरपी मैदानात सुरू आहे. या आंदोलनात अल्पसंख्यक समुदायासह ५० हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
 
मोदींच्या आंदोलनाला सकाळी १० वाजता सुरूवात झाली. लोकांचा मोठा उत्साह आंदोलनात दिसून येत आहे. आंदोलनात ८ हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

First Published: Friday, January 20, 2012, 14:20


comments powered by Disqus