राहुल गांधीनी माफी मागावी - उमा भारती - Marathi News 24taas.com

राहुल गांधीनी माफी मागावी - उमा भारती

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राहुल गांधी यांनी जे काही शब्द वापरले आहेत, त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुख उमा भारती यांनी केली आहे.
 
उमा भारती यांनी मागासवर्गीयांच्या विकासासाठी काही केले नसल्याचे वक्तव्य केले होते. बुदेलखंड रॅलीसंदर्भात काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्त केलं होतं. त्यांनी भाजप याला प्रत्युत्तर म्हणून अवमानजनक वक्तव्य करणार नसल्याचे  उमा भारती यांनी सांगितले.
 
काँग्रेस नेत्यांकडून माझ्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. राहुल गांधीने जे काही शब्द वापरले आहेत, त्याबद्दल माफी मागावी. राहुलने श्रीमंत आणि सत्ता असलेल्या नेहरू-गांधी घराण्यात जन्म घेतल्याने तो नशीबवान आहे. माझा जन्म गरीब घरात झाल्याने, मला संघर्ष करावा लागत आहे, असे उमा भारती यांनी सांगून राहुल गांधींची अवमानजनक वक्तव्ये हा गरिबांचा अपमान आहे, असे म्हटले.
 

First Published: Saturday, January 21, 2012, 15:27


comments powered by Disqus