टीम अण्णांवर 'बूटफेक' - Marathi News 24taas.com

टीम अण्णांवर 'बूटफेक'

www.24taas.com, देहरादून
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा  हजारे आणि टीमवर बूट भिरकावण्याची घटना उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये घडली आहे. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी एका कार्यक्रमासाठी डेहराडूनमध्ये आले असताना त्यांच्यावर एका माथेफिरूनं बूट भिरकावला. किशन लाल असं त्या माथेफिरूचं  नाव आहे.  त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
शरद पवारांना थप्पड मारल्याचं अण्णांना सांगण्यात आलं तेव्हा अण्णांची प्रतिक्रिया होती, 'बस एकही मारा'? या अण्णांच्या वक्तव्यावर आपण नाराज असल्याने ही चप्पलफेक केली असे किशनलालने म्हटलं आहे.
 
टीम अण्णांनी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत जागरूकता अभियान सुरू केले आहे. टीम अण्णांनी आपल्या या काँग्रेसविरोधी अभियानांची सुरवात देहरादून येथून केली, येथील लोकांनी त्यांचे अत्यंत जल्लोषात स्वागत केले.
 

First Published: Saturday, January 21, 2012, 20:44


comments powered by Disqus