देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव - Marathi News 24taas.com

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

www.24taas.com, नवी दिल्ली
 
देशाच्या ६३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज गुरवारी भारतच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राजपथ वर झेंडावंदन केलं. तसचं राजपथवर परेडची सलामी स्विकारली. या सोहळ्या निमित्त प्रमुख अतिथी म्हणून थायलंडच्या पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा सोबत आणि अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
 
तसचं राष्ट्रपतींनी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत जवळ शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी देखील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसचं संरक्षण मंत्री ए. के अॅन्थोनी हे देखील उपस्थित होते.
 
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आज सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे १५० किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यांचे प्रात्यक्षिक, तसचं अग्नी - ४ या क्षेपणास्त्राचे औपचारिक प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसचं पंतप्रधान कार्यालयातून देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसचं प्रजासत्ताक दिना निमित्त आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

First Published: Thursday, January 26, 2012, 12:12


comments powered by Disqus