मणिपूरमध्ये ३० टक्के मतदान - Marathi News 24taas.com

मणिपूरमध्ये ३० टक्के मतदान

www.24taas.com, इंफाळ
 
मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्‍चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच  रांगा लागल्या आहेत.  निवडणुकीत  पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.
 
मतदानासाठी पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमालीची थंडी असल्याने मतदानाला उशिरा जोर चढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कालापहार, मोतबंग आणि कंगपोक्‍पी या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचे वृत्त आहे.
 
दरम्यान, बंड खोर गटांनी निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचा इशारा दिल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 
 

First Published: Saturday, January 28, 2012, 15:21


comments powered by Disqus