पंजाब, उत्तराखंड विधानसभा मतदान सुरू - Marathi News 24taas.com

पंजाब, उत्तराखंड विधानसभा मतदान सुरू

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. दोन्ही राज्यात शांततापूर्ण पद्धतीने मतदान व्हावं यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
 
निवडणूक आयोगानुसार पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी १ कोटी ७६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठी ६३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पंजाबचे मुख्य निवडणूक आयोग अधिकारी कुसुमजीत सिद्धू नी सांगितले की, निवडणूक पद्धती योग्य सुरू आहे, आणि त्यासाठी योग्य ते उपाययोजना केल्या आहेत. तसचं सारे कर्मचारी आपल्या निवडणूक केंद्रावर पोहचले आहेत.
 
उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत रंगणार आहे. तर पंजाबमध्ये यंदा प्रथमच त्रिकोणी लढत रंगणार आहे. अकाली दल सोडून वेगळे झालेले मनप्रीत सिंह बादल यांनी १० महिन्यापूर्वी पीपल्स पार्टी ऑफ पंजाबची स्थापना केली आहे. म्हणजेच पीपीपी आणि डाव्यांना सोबत घेऊन त्यांनी तिसरी आघाडी उभारली आहे.

First Published: Monday, January 30, 2012, 10:07


comments powered by Disqus