अडवाणीच्या यात्रेदरम्यान सापडली स्फोटके - Marathi News 24taas.com

अडवाणीच्या यात्रेदरम्यान सापडली स्फोटके

झी २४ तास वेब टीम, मदुराई
 
भारतामध्ये दहशतवादी पुन्हा आपले डोके वर काढू पाहत आहे. कारण की, अडवाणी यांनी काढलेल्या जनचेतना यात्रेच्या मार्गामध्ये मदुराईमध्ये स्फोटकं सापडली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत भारतासमोर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र दहशतवाद्यांनी केलेला घातपाताचा कट उधळण्यात सुरक्षादल यशस्वी ठरले आहेत.
 
अडवाणींच्या जनचेतना यात्रेदरम्यान घातपाताचा कट सुरक्षादलांची उधळून लावला आहे. अडवाणींच्या यात्रा मार्गावरील मदुराईजवळच्या तिरुमंगलमध्ये एका पुलाखाली स्फोटकं सापडली. सुरक्षा दलांना तपासणीदरम्यान दोन क्रूड बॉम्ब सापडलेत. आलमपट्टी गावाजवळ हा पूल आहे. याच पुलावरुन अडवाणींचा रथ जाणार होता. स्फोटकं सापडल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला. तर अडवाणींनी मात्र रथयात्रा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार केला. रथयात्रेच्या कार्यक्रमातही कोणताच बदल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

First Published: Friday, October 28, 2011, 06:38


comments powered by Disqus