'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात - Marathi News 24taas.com

'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात

www.24taas.com,  लखनौ
 
 
युपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपलं घोषणापत्र काढलं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणापत्र देऊन सांगितलं की उत्तर प्रदेशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर –
 
 
 

  • अल्पसंख्यांकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जाईल.


 

  • अतिमागासवर्गीयांना यात उप-कोटा असेल. याशिवाय शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदरावर कर्ज दिलं जाईल.


 

  • शिक्षण क्षेत्रात १ लाखाहूनही अधिक पदांवर नोकरभरती करण्याचं ध्येय काँग्रेसने ठेवलं आहे.


 

  • पंचायत निवडणुकीत स्त्रियांना ५० टक्के आरक्षण देण्याबद्दलही घोषणापत्रात म्हटलं गेलं आहे.


 

  • युपीच्या सर्व युनिव्हर्सिटींमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणूका होतील.


 

  • उर्दू भाषेला द्वितीय राज्यभाषेचा दर्जा दिला जाईल.


 

  • युपीतील भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना लोकपालच्या कक्षेत आणलं जाईल.


 

  • मनरेगा घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत होईल.


 
 
हे घोषणापत्र अलाहबाद, कानपूर, आग्रा, गोरखपूर, लखनौ, शाहजहांपूर, सहारणपूर, झाँशी आणि बरेली येथे एखाच वेळी प्राकाशित करण्यात येईल. घोषणापत्राच्या प्रकाशनाच्या वेळी केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल, सलमान खुर्शिद, जयराम रमेश, गुलाब नबी आझाद, सुशील कुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग, जनार्दन आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग इ. वेगवेगळ्या जागी हजर होते.
 
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 17:45


comments powered by Disqus