Last Updated: Wednesday, February 1, 2012, 10:56

फ्रान्सच्या राफेलने भारतीय हवाई दलाला १२६ लढाऊ विमाने पुरवण्याचं प्रतिष्ठेचे कंत्राट मिळवलं आहे. राफेल भारतीय हवाई दलाला १२६ मीडियम मल्टिरोल कॉमबॅट एअरक्राफ्ट पुरवणार आहे. हा व्यवहार तब्बल १० बिलियन डॉलर्स किंवा ७५,००० कोटी रुपयांचा आहे.
सुरवातीला राफेल कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेतून बाद झालं होतं. पण अखेर राफेल या फ्रेंच कंपनीने युरोपियन इएडीएसच्या टायफूनला मागे टाकत हे कंत्राट पटकावलं. निविदा प्रक्रियेच्या सुरवातीला तांत्रिक निकषांच्या बाबतीत राफेलमध्ये काही उणीवा दिसून आल्याने त्यांना वगळण्यात आलं होतं.
जर्मनी, ब्रिटन, इटली, स्पेन आणि युरोपियन कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेत अखेर फ्रेंच राफेलने बाजी मारली. भारतीय हवाई दलाने लॉकहिड मार्टीन एफ-१६, बोईंग एफ ए -१८, रशियन युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्प्स मिग-३५ आणि स्विडीश साब कंपनीच्या ग्रिपेन यांच्या तुलनेत फ्रेंच राफेलला पसंती दिली. कंत्राट जिंकणाऱ्या कंपनीला भारतीय संरक्षण उद्योगात व्यवहाराच्या ५० टक्के रक्कम गुंतवण्याची अट करारात घालण्यात आली आहे.
First Published: Wednesday, February 1, 2012, 10:56