Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:32
www.24taas.com, नवी दिल्ली गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्या काळात दिलेली सर्व 2 G लायसन्स रद्द करण्याचा निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा खटला ट्रायल कोर्टाकडे सोपवला असला तरी त्यांना क्लिन चीट देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षाने आक्रमक होत सरकारवर निकाराचा हल्ला चढवला आहे. आता तरी पंतप्रधान कारवाई करणार का असा सवाल भाजपने केला आहे.
पी.चिदंबरम यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही असं अरुण जेटली म्हणाले. पंतप्रधान आणि सोनिया गांधींनी देशाला उत्तर द्यावं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.पंतप्रधानांनी आता तरी या प्रकरणी जबाबदारी घ्यायला हवी असंही जेटलींनी ठणकावून सांगितलं.
First Published: Thursday, February 2, 2012, 13:32