Last Updated: Friday, February 3, 2012, 12:50
www.24taas.com, गुवाहटी आसाममधील गुवाहटीजवळ रेल्वे अपघातात २ ठार, तर ५० जण जखमी झालेत. हा अपघात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला.
इथल्या कामरुपमधील मिर्जा इथं मानवरहित रेल्वे क्रॉसींगला जेसीबी मशीनला रेल्वे धडकली. यावेळी जेसीबीचा ड्रायव्हर जागीच ठार झाला तर रेल्वेतील ५० प्रवाशी जखमी झालेत. रेल्वे पटरीवरून पाच डबे खाली उतरल्याने अनंक जण जखमी झालेत. घटना स्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
First Published: Friday, February 3, 2012, 12:50