जरावांच्या शोषणाचे आणखीन दोन पुरावे - Marathi News 24taas.com

जरावांच्या शोषणाचे आणखीन दोन पुरावे

www.24taas.com, नवी दिल्ली
 
नवी दिल्ली अंदमान बेटावरील जरावा जमातीच्या लोकांना अन्नासाठी बळजबरीने नाचायला लावण्याची दृष्यं चित्रित केलेल्या आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहेत. याआधीच्या व्हिडिओने जगभरात खळबळ माजवली होती.
 
आधीच्या व्हिडिओ प्रमाणेच या चित्रफितीमध्ये पोलिस जरावांना नाचण्याचा हुकुम देताना दिसत असल्याचं उघड झालं आहे. तसंच गणवेशातील पोलिस स्पष्टपणे व्हिडिओ दिसतात आणि ते हिंदीत जरावांना नाचण्याचा हुकुम देत असल्याचं दिसून आलं आहे. याआधीही एका ब्रिटीश वर्तमानपत्राने अंदमान बेटांवरील अर्धनग्न अवस्थेत जरावा पर्यटकांसमोर नाचतानाचा व्हिडिओ रिलीज करुन खळबळ उडवून दिली.
 
अंदमान आणि निकोबार पोलिसांनी ब्रिटीश पर्यटकांना जरावांसाठीच्या संरक्षित भागात सहल आयोजीत करुन अर्धनग्न अवस्थेतील जरावा जमातीच्या महिलांचा व्हिडिओ उपल्बध करुन दिल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली.

First Published: Sunday, February 5, 2012, 11:32


comments powered by Disqus