सुधींद्र कुलकर्णींचा वाढला तिहार मुक्काम! - Marathi News 24taas.com

सुधींद्र कुलकर्णींचा वाढला तिहार मुक्काम!


झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
'कॅश फॉर व्होट' प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सुधींद्र कुलकर्णींचा तिहार जेलमधील मुक्काम वाढला आहे. कुलकर्णींच्या सोबत फग्गनसिंग कुलस्ते, आणि कुलदिपसिंग भगोडाही जेलमध्ये आहेत.  दिल्ली हायकोर्टानं त्यांच्या जामिनावरील सुनावणी १४ नोहेंबरपर्यंत पुढे ढकललण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलिसांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सुधींद्र कुलकर्णींना जामीन का देऊ नये असा सवाल कोर्टानं पोलिसांना नोटीसीत विचारला आहे.

First Published: Monday, October 31, 2011, 06:44


comments powered by Disqus