रॉबर्ट वढेरांचे राजकारण प्रवेशाचे संकेत - Marathi News 24taas.com

रॉबर्ट वढेरांचे राजकारण प्रवेशाचे संकेत

www.24taas.com, अमेथी
 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयी संकेत दिले आहेत. प्रियांका गांधींचे पती असलेल्या रॉबर्ट वढेरा यांनी सध्या राजकारणात राहुल गांधींची वेळ आहे पण जनतेने आग्रह केल्यास सक्रिय राजकारणात उतरु असं म्हटलं आहे. रॉबर्ट वढेरा यांनी काँग्रेसला समर्थन लाभावं यासाठी अमेथी मतदारसंघात मोटरसायकल रॅली काढली.
 
वढेरा आणि त्यांची कन्या यांचे काल अमेथीत आगमन झालं आणि आज सकाळी गौरगंज भागात त्यांनी रॅलीत सहभाग घेतला. तसंच अमेथीतील सलोन विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेत भाषण देखील केलं. वढेरा यांनी वार्ताहारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राहुल गांधींचा संदेश देण्यासाठी कुटुंबातील सदस्य म्हणून पाठिंबा देत असल्याचं सांगितलं. राहुल गांधींचा संदेश गावागावात पोहचवण्यासाठी आल्याचं वढेरा यांनी सांगितलं.  राहुल गांधी पंतप्रधानपदी विराजमान होण्याची वेळ आली आहे का ? या प्रश्नावर त्यांनी बोलायला नकार दिला.
 
 
 
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 16:10


comments powered by Disqus