Last Updated: Tuesday, February 7, 2012, 15:05
www.24taas.com, नवी दिल्ली केंद्र सरकार २०१२-२०१३ सालचा अर्थसंकल्प १६ मार्च रोजी संसदेत मांडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने योजना आयोगाच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. तसंच १४ मार्च रोजी रेल्वे अर्थसंकल्पही मांडण्यात येईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ मार्च रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय सत्राला सुरवात होईल. अर्थसंकल्पीय सत्र १२ मार्च ते ३० मार्च दरम्यान चालणार आहे. आर्थिक सर्वेक्षणाचे काम १५ मार्चला सुरु होईल.
विशेष म्हणजे अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी तीन आठवड्यांपूर्वी अर्थसंकल्प पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर मांडण्यात येईल असं म्हटलं होतं.
First Published: Tuesday, February 7, 2012, 15:05