वजनदार नेत्यांमुळे 'स्टेज खाली' - Marathi News 24taas.com

वजनदार नेत्यांमुळे 'स्टेज खाली'

www.24taas.com, गाझीपूर
 
राजकीय स्टेजवर बसण्यासाठी नेत्यांची चढाओढ नेहमीच असते. त्यातही पक्षाचे वरिष्ठ नेते आले की मग मी पुढं की तू पुढं अशी स्पर्धा लागते. मग स्टेजवरच्या गर्दीच होते. अनेकवेळा स्टेजचं वजन इतकं होतं ते कोसळतं.
 
आज देखील असचं काहीस घडलं ते देखील भाजपचा मंचावर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या सोबत देखील असाच काहीसा प्रकार घडल्यानं त्यांच स्टेज जोरात कोसळलं.  त्या स्टेजसह सोफ्यावर बसलेले गडकरी  खाली पडले.
 
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूरच्या सभेत हे  स्टेज कोसळलं.  गडकरींच्या स्वागतासाठी स्टेजवर गर्दी झाल्यामुळे हे स्टेज कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
 
 
 

First Published: Wednesday, February 8, 2012, 15:11


comments powered by Disqus