'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले - Marathi News 24taas.com

'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले

www.24taas.com, बंगळुरू
 
कर्नाटकातल्या तीन मंत्र्यांना विधान परिषदेत अश्लील चित्रफित पाहण्याचा प्रकार चांगलाच भोवला आहे. या तीनही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
 
कर्नाटकचे महिला आणि बालकल्याण मंत्री सी. सी. पाटील, सहकार मंत्री लक्ष्मण सावदी आणि पर्यावरण मंत्री कृष्णा पालेमार या तिघांनी विधान परिषदेत बसून मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाहत असल्याचं एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झालं.  त्यानंतर कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
 
ही बाब समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आलेत.  मुख्यमंत्र्यांकडूनही या तीनही मंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र  भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी याची तातडीनं दखल घेत,  या तीनही मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी केली. या तिघा मंत्र्यांनी राजीनामे दिले असले तरी ते अजूनही विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे सोपवण्यात आलेले नाहीत.

First Published: Wednesday, February 8, 2012, 10:55


comments powered by Disqus