Last Updated: Friday, February 10, 2012, 16:55
www.24taas.com, मुंबई इंडियन मुजाहिद्दीनला आयएसआय मदत करत असल्याची धक्कादायक कबुली हरुन रशीद नाईकने दिली आहे. आयएसआयचा जनरल मुराद इंडियन मुजाहिद्दीनला मदत करत असल्याचं नाईकने सांगितलं.
मुंबईत १३/७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी नाईकला एटीएसने अटक केली होती. हरुन रशीद नाईकच्या तपासातून ही धक्कादायक माहिती मिळाल्याचं एटीएसने सांगितलं. आजवर पहिल्यांदाच आयएसआयमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱयाचे नाव तपासात समोर आल्याचं एटीएसने सांगितलं. हरुनने इंडियन मुजाहिद्दीनमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.
रियाझ भटकळला याची जाणीव होताच त्याने हरुनला साईडलाईन केल्याची माहितीही हाती आली आहे. यावरुन इंडियन मुजाहिद्दीनमध्ये फूट पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ?
First Published: Friday, February 10, 2012, 16:55