Last Updated: Saturday, February 11, 2012, 23:07
www.24taas.com, लंडन परदेशात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. ऑस्ट्रेलियातही असे हल्ले झाले होते. आज शनिवारी झालेला हल्ला हा इंग्लंड येथे झाला आहे. एका भारतीय विद्यार्थ्यावर काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यामुळे ग्रेटर मॅंचेस्टर येथे पुण्यातील विद्यार्थी अनुज बिडवेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत. प्रवीण रेड्डी (२६) असे भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीला होता. आज लंडन येथील निवासस्थानी काही तरुणांनी त्याला चाकूने भोकसले. यात तो गंभीर जखमी झाला.
त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लंडन पोलिसांनी १०जणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हल्ल्याचे वृत्त समजल्यावर प्रवीण रेड्डी याच्या वडिलांनी त्वरित व्हिसा देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे.
First Published: Saturday, February 11, 2012, 23:07