Last Updated: Saturday, February 11, 2012, 23:14
www.24taas.com, लखनऊ संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठीचे ६० टक्के मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी सकाळी मतदानकेंद्रांसमोर रांगा लावल्या आहेत. यात एकूण एक कोटी ९७ लाख लोक मतदान करणार असून, ५९ मतदारसंघ आहेत.
आज सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले असून, यात नऊ जिल्ह्यांचा समावेश आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सूर्यप्रताप साही, बहुजन समाज पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य, समाजवादी पक्षाच्या उपाध्यक्षा अंबिका चौधरी, पीस पार्टीचे सर्वेसर्वा डॉ. मोहंमद अयूब यांच्यासह तब्बल एक हजार ९८ उमेदवार रिंगणात आहेत.
आझमगड, गोरखपूर, बलिया, गाझीपूर, महाराजगंज, देवरिया, माऊ, संत कबीरनगर आणि कुशीनगर या जिल्ह्यांत मतदान होणार आहे. यात दलित मतदारांची संख्या अधिक आहे. निवडणूक रिंगणात केवळ ७६ महिला उमेदवार आहेत, तसेच ३१ विद्यमान आमदारांसह २४माजी मंत्र्यांचे भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे. निवडणूक आयोगाने २० हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मते देण्यासाठी २१ हजार मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
First Published: Saturday, February 11, 2012, 23:14