Last Updated: Monday, February 13, 2012, 18:52
www.24taas.com, नवी दिल्ली 
दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. पेट्रोल पंपाजवळ एका इनोव्हा गाडीत स्फोट झाला आहे. स्फोट ज्या गाडीत झाला, ती गाडी इस्रायली दूतावासाची असल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या घराजवळच ही घटना घडली आहे. आतापर्यंत या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार या स्फोटात जवळजवळ ४ जणं जखमी झाल्याचे समजते. तसचं या स्फोटामुळे आजूबाजूच्या इतर गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. पेट्रोल पंपाच्या काही अंतरावरच एका इनोव्हा कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या इनोव्हा कारचा नंबर १०९ सीडी -३५ असा आहे. ही गाडी कोणाची होती हे देखील अजूनपर्यंत समजू शकलले नाही.
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहचली आहे. ते पुढचा तपास करीत आहे. तसचं ही टीम आता स्फोटाचे कारण शोधत आहे, हा स्फोट सीएनजी गॅसमुळे झाला आहे की आणखी कश्यामुळे यांच्या शोध आता लावला जात आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसचं संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसचं स्फोटाच्या ठिकाणी बॉम्बनाशक पथक देखील पोहचलं आहेत. स्फोटाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
First Published: Monday, February 13, 2012, 18:52