Last Updated: Monday, February 13, 2012, 19:43
www.24taas.com, मुंबई आज दिल्लीत इस्रायली दुतावासाच्या टोयोटा इनोव्हात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर परत एकदा १३ तारीख आणि स्फोटांचे कनेक्शन समोर आलं आहे. आजवर देशाच्या अनेक ठिकाणी १३ तारखेलाच स्फोट का घडवण्यात येतात त्याचं गूढ उलगडू शकलेलं नाही. आता हा निव्वळ योगायोग मानावा की त्यामागे दहशतवादी गटांचे काही खास कारण असावं याबाबतीत अजून निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही.
यापूर्वी १३ तारखेला घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या घटना. १) १३ डिसेंबर २००१- संसदेवर हल्ला- सात जण मृत्यूमुखी
२) १३ मार्च २००३- मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट- ११ जण मृत्यूमुखी
३) १३ मार्च २००८- जयपूरमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका- ६३ जण मृत्यूमुखी
४) १३ सप्टेंबर २००८- दिल्ली मार्केटमध्ये बॉम्बस्फोट- २१ जणांचा मृत्यू
५) १३ फेब्रुवारी २०१०- पुण्याच जर्मन बेकरी बॉम्बस्फोट- १७ जणांचा बळी
६) १३ जुलै २०११- मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट- २७ जणांचा बळी
First Published: Monday, February 13, 2012, 19:43