Last Updated: Wednesday, November 2, 2011, 10:17
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली केंद्रीय गुप्तचर विभागाकडून आज नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
राजधानीत आज 'लष्कर - ए -तोएबा' या दहशतवादी संघटनेचे ५ दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलीस फौज तैनात करण्यात येणार आहे. या दहशतवाद्यांच्या निषाणावर नक्की कोणती ठिकाणे आहेत, ते मात्र अजून स्पष्ट होऊ शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
First Published: Wednesday, November 2, 2011, 10:17