Last Updated: Wednesday, November 2, 2011, 13:08
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
पेट्रोलचे दर हे दिवसेंदिवस वाढत असताना आता डिझेल आणि एलपीजी गॅसचे भाव सुद्धा वाढण्याची शक्यता पुन्हा एकदा वर्तविली जात आहे. यामुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त होणार आहे.
पेट्रोलचे दर वाढणार असल्याची चर्चा सुरू असताना आता डिझेल आणि घरगुती गॅसच्याही किमतीत वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाववाढीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिगटाची बैठक होणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी दिली आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमुल्यन झाल्यामुळं तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
त्यामुळं डिझेल आणि गॅसच्या खरेदीत तेल कंपन्यांना दरदिवशी 333 कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा देशातल्या तिन्ही तेल कंपन्यांनी केला. इंधनाच्या दरवाढीचा निर्णय तेल कंपन्याच घेतील असं सांगत भाववाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांनी हात झटकले आहेत. इंधन भाववाढीसंदर्भात सरकारची कुठलीही भूमिका नसल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.
First Published: Wednesday, November 2, 2011, 13:08