कर्नाटकाचे शिक्षणमंत्री आचार्य यांचं निधन - Marathi News 24taas.com

कर्नाटकाचे शिक्षणमंत्री आचार्य यांचं निधन

www.24taas.com, बंगळूर
 


कर्नाटकाचे शिक्षणमंत्री आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. आचार्य (७२) यांचे एका कार्यक्रमातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले.
 
 
 
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आचार्य यांचा जन्म १९३९ मध्ये उडुपी येथे झाला.  ते व्यवसायाने डॉक्‍टर होते. भाजपची अनेक पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
 
 
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवानी, राज्यसभेचे उपाध्यक्ष के. रेहमान खान, केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा व एम. वीरप्पा मोईली यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

First Published: Tuesday, February 14, 2012, 23:08


comments powered by Disqus