Last Updated: Wednesday, February 15, 2012, 08:40
www.24taas.com,लखनऊ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील १० जिल्ह्यातील ५६ जागांकरता मतदार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील.
आज तब्बल ७७ महिला उमेदवारांसह १०१८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, १८,३७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. आज १,७७,९१, ८९३ मतदान मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी जवळपास ३०,००० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. सर्वाधिक ३० उमेदवार ओबरा विनानसभा मतदारसंघात लढतीत आहेत. तर सर्वात कमी उमेदवारी जगदीशपूर (११), मुझनपुर (११), आणि दुधी (११) या मतदारसंघात रिंगणात आहेत.
आज छत्रपती शाहूजी महाराजनगर, सुल्तानपूर, कौशम्बी, जौनपूर, वाराणसी, सोनभद्र, मिर्झापूर, अलाहाबाद, भदोही आणि चंदौली या जिल्ह्यात मतदान होणार आहे. यापैकी सोनभद्र, मिर्झापूर हे जिल्हे नक्षलग्रस्त आहेत आणि तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
First Published: Wednesday, February 15, 2012, 08:40