Last Updated: Wednesday, February 15, 2012, 11:49
www.24taas.com, रायबरेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी या मायलेकीचं प्रेम पाहून रायबरेलीतल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
आपल्या आईसोबत पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर आलेल्या प्रियंका गांधींच्या आईवरच्या प्रेमाला भर सभेत ऊत आला आणि त्यांनी सोनियांचा गालगुच्चा घेत प्रेम व्यक्त केलं. राजकारणात जाहीरपणे असा नात्यातला ओलावा व्यक्त होण्याचे क्षण दुर्मिळच. प्रियंकाच्या या मायेनं सोनियांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. त्यापूर्वी प्रियंका गांधींनी त्यांच्या मुलांना रायबरेली गाव दाखवलं, तेव्हा रायबरेलीकरांच्या मनात सोनिया आणि राजीव गांधींच्या आठवणी ताज्या झाल्या.
या आधीही रायबरेलीतीलच प्रचारसभेत प्रियांकाने मंचावर आपल्या मुलांना धक्का दिला होता आणि आई मुलांमधील खेळीमेळीचं वातावरण लोकांना पाहायला मिळालं होतं. त्यावेळी मुलगी मेराया आणि मुलगा रेहानसह प्रियांका रायबरेलीतील सभेला उपस्थित होती.
First Published: Wednesday, February 15, 2012, 11:49