Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:31
www.24taas.com, गोवा 
गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबीयांना उमेदवारी वाटून घेतली आहे. आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
काँग्रेसकडून पाच कुटुंबात मिळून १२ जणांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये मंत्री आलेमाव यांच्या कुटुंबात चार जणांना, प्रतापसिंह राणे यांचा मुलगा विश्वजीत राणे, मंत्री रवी नाईक यांचा मुलगा रितेश, बाबूश मोन्सेरोत यांच्या बरोबर त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी दिली आहे.
तर मडकईकरांच्या घरात दोघांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसच्या या घराणेशाहीमुळं भाजपच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे, त्यामुळे हा मुद्दा काँग्रेसला अडचणीत आणण्याची चिन्हा दिसत आहे.
First Published: Wednesday, February 15, 2012, 16:31