भाजपाच्या अजेंड्यावर काळा पैसा - Marathi News 24taas.com

भाजपाच्या अजेंड्यावर काळा पैसा

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
भाजप आता जनलोकपालच्या मुद्यापासून फारकत घेणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपच्या अजेंड्यावर जनलोकपालचा विषय असणार नाही, तर भाजप काळ्या पैशांचा मुद्दा लावून धरणार आहे. जनचेतना यात्रेदरम्यान भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुण्यात ही घोषणा केली आहे. अण्णा हजारेंच्या जनलोकपालला भाजपचा पाठिंबा आहे. पण हिवाळी अधिवेशनामध्ये महागाई, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या मुद्द्यांवरुनच सरकारला धारेवर धरणार असल्याचं अडवाणींनी स्पष्ट केलंय.

First Published: Friday, November 4, 2011, 17:51


comments powered by Disqus