उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान - Marathi News 24taas.com

उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

www.24taas.com, लखनऊ
 
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान रविवारी पार पडलं. चौथ्या टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक 57 टक्क्यांहून अधिक मतदान झालं. 403 पैकी आतापर्यंत 226 जागांसाठी मतदान झालंय. मतदानाचा कडा पाहता जनतेचा कौल नेमका कुणाला असेल याबाबत मत मांडणं राजकीय विश्लेषकांना कठीण जातंय.
 
चौथ्या टप्प्यात सामान्यांसोबतचं उच्चभ्रू लोकांनीही मतदान केल्याचं समजतंय. चौथ्या टप्प्यातल्या मतदानानं बसपच्या 4 मंत्र्यांचंही नशीब ईव्हीएममध्ये बंद झालं आहे.  लखनऊ, रायबरेली, हरदोई, उन्नाव, फर्रूखाबाद, कन्नौज, बांदा, चित्रकूट, प्रतापगढ़, फतेहपुर आणि छत्रपति साहूजी महाराज नगर या जिल्ह्यांमधल्या ५६ विधानसभा मतदारसंघात आज मतदान झालं. आज एक कोटी ७४ लाख मतदारांच्या हाती ९६७ उमेदवारांचे भवितव्य होतं.  आज तीन मंत्री, ३२ विद्ममान आमदार, १२ मंत्री,  भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कलराज मिश्रा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रिटी बहुगुणा जोशी यांच्या भवितव्याचा फैसला मशीनमध्ये सीलबंद झालं आहे.
 
 

First Published: Sunday, February 19, 2012, 21:35


comments powered by Disqus