Last Updated: Monday, February 20, 2012, 00:16
www.24taas.com, जुनागड गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात असलेल्या भावनाथ मंदिरात वार्षिक महाशिवरात्रीच्या यात्रेत चेंगराचेगरीत पाच जण मृत्यूमुखी पडले तर जवळपास वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका चार चाकी वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. राजकोटपासून भावनाथ मंदिर १५० किमी अंतरावर आहे. दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक गर्दी करतात. प्रचंड गर्दीमुळे जखमींना रुग्णालयात हलवण्यात अडथळे येत आहेत.
First Published: Monday, February 20, 2012, 00:16