गुन्हा केला राहुल गांधींनी? - Marathi News 24taas.com

गुन्हा केला राहुल गांधींनी?

www.24taas.com, कानपूर
 
यूपीमध्ये आचारसंहिता दरम्याना राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना युपीमध्ये वेग आला आहे. यूपीत काँग्रेस महासचिव राहुल गांधीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
 
मंजुरी नसलेल्या मार्गांवर रोड शो केल्याप्रकरणी प्रशासनानं आतापर्यंत ४० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ही विरोधकांची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. राहुल गांधी यांनी काल कानापूरमध्ये रोड शो केला. ४० किलोमीटरच्या मार्गावर रोड शो करण्याची परवानगी काँग्रेसनं मागितली होती.
 
मात्र प्रशासनानं परवानगी नसल्याच्या कारणावरून २० किलोमीटरवरच रोड शो थांबवला आणि राहुलसह दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे यूपीतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
 
 

First Published: Tuesday, February 21, 2012, 12:24


comments powered by Disqus