Last Updated: Wednesday, February 22, 2012, 12:47
www.24taas.com, नवी दिल्ली 
रेल्वेमध्ये तब्बल सव्वा लाख पदं ही रिक्त असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे ही पदं रिक्त असल्याने रेल्वे उच्च स्तरीय समितीने चिंता व्यक्त केली आहे, तसचं ही रिक्त पदं वेळेत म्हणजेच सहा महिन्यात भरण्यात यावी अशी मागणी केली आहे.
समितीचं म्हणणं आहे की, रेल्वे बोर्डावर प्रशासनाचं नियंत्रण असल्याने भरती प्रक्रिया करण्यास वेळ लागत आहे. यासाठीच रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण असे अधिकार देऊन या भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने या समितीने मागील आठवड्यात आपला रिपोर्ट रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांना सुपूर्त केला.
समितीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या रिक्त पदांमुळे रेल्वे संपत्तीचं रक्षण करणं कठीण जात आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील प्रभावित होत आहे. समितीचं मत असं आहे की, महत्त्वपूर्ण सुरक्षा श्रेणीतील पद ही जास्तीत जास्त तीन महिन्यापर्यंत रिक्त राहू नयेत.
First Published: Wednesday, February 22, 2012, 12:47