Last Updated: Thursday, February 23, 2012, 14:48
www.24taas.com, नवी दिल्ली बाबा रामदेव यांच्या आंदोलकांवर रामलिला मैदानावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार चुकीचा होता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
त्याच वेळेस बाबा रामदेव यांचीही चूक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. लाठीमार प्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर खटले दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
रामदेव बाबा गर्दीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत असं मत निकालात नोंदवण्यात आलं आहे. लाठीमारात जखमी झालेल्यांना पोलिसांनी तसंच रामदेव बाबांच्या ट्रस्टने नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ट्रस्टने २५ टक्के नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. रामदेव बाबा आणि दिल्ली पोलीस या दोघांनीही संयम बाळगायला हवा होता.
First Published: Thursday, February 23, 2012, 14:48