काला आजारवर अखेर लस विकसीत - Marathi News 24taas.com

काला आजारवर अखेर लस विकसीत

www.24taas.com, बंगलोर
 
उत्तर भारतात काला आजाराच्या थैमानात दरवर्षी शेकडो लोकांना आपले प्राम गमवावे लागतात. जगात मलेरियाच्या पाठोपाठ सर्वाधिक मृत्यू काला आजारामुळे होतात. आता पहिल्यांदाच काला आजारवर लस तयार करण्यात यश आलं असून लवकरच वैद्यकीय चाचणीच्या टप्प्याला सुरुवात होईल. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने या चाचण्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.
 
सिएटलस्थित इनफेक्शियस डिसिज रिसर्च इन्स्टिट्युट या लसींची पहिल्या टप्प्याची चाचणी भारतात घेणार आहे. आयडीआरआय पुण्याच्या जिन्नोवा बायोफार्मास्युटिकल्सला चाचण्या घेण्यासाठी तंत्रज्ञान हंस्तारित करणार आहे. पुण्यात २०१२ मध्ये घेण्यात येणाऱ्या क्लिनिकल ट्रायलसाठी नवं केंद्र उभारण्यात आलं आहे. अमेरिकेतील वॉशिंगटन राज्या लसीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीला सुरुवात झाल्याचं आयडीआरआयने म्हटलं आहे.
 
आयडीआरआयचे संस्थापक आणि चीफ सायंटिफिक ऑफिसर स्टीव्ह रीड यांनी आयएएनएसला सांगितलं की भारताबरोबरच्या भागीदारीमुळे प्रभावी लस वेगाने विकसीत करता येईल तसंच आजारावर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया जलदगतीने होऊ शकेल.
 
काला आजारावरील लसीची वैद्यकीय चाचणी हा मैलाचा टप्पा मानला जाईल कारण एड्सपेक्षा अधिक वेगाने माणसं या आजाराच्या संसंर्गाने मृत्युमुखी पडतात. संसर्गाची लागण झालेले नव्वद टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात.  संसर्ग झाल्यानंतर माणसाची त्वचा काळी ठिक्कर पडत असल्याने या आजाराला काला आजार असं म्हटलं जातं. भारत, नेपाळ, बांग्लादेश, सुदान आणि ब्राझिलमध्ये दर पाच लाख लोकं काला आजाराने बाधित होतात तर पन्नास हजार लोक मृत्युमुखी पडतात.
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 18:23


comments powered by Disqus