Last Updated: Thursday, February 23, 2012, 18:33
www.24taas.com, नवी दिल्ली देशातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी असणाऱ्या टाटा कंसल्टंसीने विदेश मंत्रालयाच्या साथीने दिल्लीमध्ये आवेदन आणि निर्गमसेवा केंद्र सुरू केलं आहे. टीसीएसद्वारे चालवल्या जाणाऱ्या या केंद्रावर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यास केवळ तीन दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो.
मंत्रालयातर्फे ऑक्टोबर २००८ पासून टीसीएसला इ-गव्हर्नंस अंतर्गत देशभरात ७७ केंद्रांवर पासपोर्ट सर्व्हिस सेंटर्सची स्थापना करण्याचा परवाना मिळाला आहे. यातील ५० केंद्रांवर यापूर्वीच काम सुरू झालेलं आहे. कंपनी पायलट परियोजने अंतर्गत बंगळुरूमध्ये याची सुरूवात झाली. या योजनेनुसार पोलीस चौकशी झाल्यानंतर फक्त ३ दिवसांत अर्जदाराला पासपोर्ट मिळणार.
कंपनीचे मुख्य अधिकारी आणि प्रोजेक्ट डायरेक्टर एन. चंद्रशेखरन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की पासपोर्ट सेवेसारख्या इ-गव्हर्नंस सुविधा उपलब्ध करून देण्यात उत्तम प्रकारे मदत करेल. याशिवाय बाकीच्या सेवा एप्रिलपर्यंत सुरू होतील. टीसीएस या सेंटर्सची जबाबदारी पुढील ७ वर्षांपर्यंत घेणार आहे.
First Published: Thursday, February 23, 2012, 18:33