Last Updated: Friday, February 24, 2012, 16:27
www.24taas.com, नवी दिल्लीआयकर भरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाख ८० हजार रुपयांवरुन तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासंदर्भात संसदीय समितीचे एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनुसार आयकराची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात यावं असं संसदीय समितीचे मत आहे.
चलनवाढीचा दर दोन आकड्यांपर्यंत पोहचल्याने रुपयाची क्रय शक्तीत घट झाल्याने सरकारने आयकराची मर्यादा वाढवावी असं समितीचं म्हणणं आहे. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन (डीटीसी)चा अवलंब करुन कर प्रणालीचं आधुनिकीकरण करण्याची सरकारची योजना आहे. आयकर कायदा १९६३ च्या जागी डायरेक्ट टॅक्स कलेक्शन लागु करण्यात येणार आहे.
सध्याची परिस्थिती....
पुरुषांसाठी… १.८० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
याआधी ही मर्यादा १.६० लाख होती
महिलांसाठी … महिलांसाठी मागील १.९० लाखांची मर्यादा कायम
ज्येष्ठ नागरिकांसाठी… ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्ष
यातही दोन ६० ते ७९ आणि ८० ते पुढे असे दोन भाग पाडण्यात आले आहेत.
६० ते ८० वर्ष वयोमर्यादेतील ज्येष्ठांना २.५० पर्यंतचे उत्पन्न करमुक्त
८० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी विशेष करसवलत
८० वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
First Published: Friday, February 24, 2012, 16:27