Last Updated: Friday, February 24, 2012, 17:26
www.24taas.com, मुंबई एक जुना वाक्प्रचार आहे, दुधाच्या शंभरपट चांगलं दही असतं. दह्यामध्ये रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. त्यामुळे आयुर्वेदाचे जाणकार रोज दही खाण्याचा सल्ला देतात. दह्याचे फायदे खूप आहेत, त्यातले काही निवडक फायदे पुढे दिलेले आहेत.
आयुर्वेदाच्या मते, दह्यामुळे आरोग्य सुधारते. रोज दही खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उन्हाळ्यात दह्याचं ताक किंवा लस्सी प्यायल्यास पोटातील आग शांत होते. ताक पिऊन घराबाहेर पडल्यास ऊन्हाचा त्रास होत नाही. दह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्याने दह्यामुळे पचनक्षमता वाढते. दह्यात अजमोडा घालून प्यायल्यास बद्धकोष्टता नाहीशी होते.
रोज दही खाल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. तसंच सर्दी होत नाही. श्वासनलिकेला कुठलंही इन्फेक्शन होत नाही. अल्सरसारख्या आजारांमध्ये दही लाभदायक ठरते. तोंड आलं असल्यास दह्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे आलेलं तोंड बरं होतं. दह्यामध्ये मीठ, जीऱ्याची पुड, पुदीना घालून सेवन केल्यास अन्नपचनास मदत होते तसंच भूकही वाढते.
First Published: Friday, February 24, 2012, 17:26