कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी - Marathi News 24taas.com

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सदानंद गौडाच राहतील, असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांनी पुन्हा दबावाचं राजकारण सुरू केलं आहे.
 
 
पक्ष नेतृत्वानं २७ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री पद द्यावे, अन्यथा मार्ग मोकळा आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. पण येडियुरप्पा यांच्या दबावाखाली न येता, भाजप आपल्या निर्णयावर ठाम आहे. येडियुरप्पांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणून पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. यासाठी आमदारांची बैठक बोलावून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले.
 
 
कर्नाटकातील अवैध खाणींप्रकरणी नाव आल्यानं येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून सदानंद गौडा यांचं नाव पुढे केलं होतं. मात्र आता येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी पुन्हा जोर लावायला सुरूवात केली आहे. मात्र, गडकरींनी चाप लावल्याने येडियुरप्पा काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
 
आणखी काही बातम्या
 
येडियुरप्पा यांना पलटवार, गौडाच मुख्यमंत्री
 
भाजपलाच इशारा, माझा मार्ग मोकळा – येडियुरप्पा
 
 

First Published: Friday, February 24, 2012, 16:22


comments powered by Disqus