Last Updated: Sunday, February 26, 2012, 10:03
www.24taas.com, गोवा 
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध उत्तर भारतात आंदोलन करणाऱ्या योगगुरु रामदेवबाबांनी गोव्याकडे लक्ष वळवलं आहे. पणजीमधल्या आझाद मैदानावर आज एक दिवसाचा उपवास, योग आणि यज्ज्ञ करणार आहेत.
एकदिवसाच्या या अनोख्या उपक्रमातून रामदेवबाबा गोव्यातल्या नागरिकांना चारित्र्यवान उमेदवारांनाच निवडणून देण्याचं आवाहन करणार आहेत. गोवा विधानसभेसाठी ३ मार्चला मतदान होणार आहे. १९ पक्षांचे २१५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील ३० जणांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
भ्रष्टाचारी राजकारण्यांविरुद्ध रामदेवबाबांनी आपला मोर्चा वळवला आहे. दिल्लीत रामलीला मैदानावरील उपोषण आणि त्यानंतर पोलिसांनी केलेला हल्ला यानंतर रामदेव बाबा पुन्हा सरसावले आहेत हे भष्ट्राचाराविरोधात प्रचार करण्यासाठी.
First Published: Sunday, February 26, 2012, 10:03